Tuesday, 18 April 2017

हे आसवांनो, डोळ्यांत माझ्या
आलात का आज सांगा. ..
कुणी जोडीला हृद्यासवे
या नयनांचा धागा. ..

तिची आठवण मनास येते
ती भेटते, मीही भेटतो. ..
त्यांना करता जवळ जरासे
तुमचे परके होणे का गा?

© विशाल इंगळे. ..
(मंगळवार, एप्रिल १८, २०१७; २२:५६)

No comments:

Post a Comment